मुंबई : 'आँखों की... गुस्ताखियां... माफ हो....', असं म्हटलं की अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचे भुरळ पाडणारे ते डोळे लगेचच समोर येतात. आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. पण, सोबतच ती या साऱ्यामध्ये कलाविश्वापासून दुरावलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या अभिनेत्रीच्या सौंदर्याप्रमाणे सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे, ती म्हणजे हुबेहूब तिच्याप्रमाणेच दिसणाऱ्या एका अभिनेत्रीची. ही अभिनेत्री मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी नवी नाही. सोशल मीडियावर ऐश्वर्याप्रमाऩेच दिसाऱ्या या सौंदर्यवतीचं नाव आहे, मानसी नाईक. 


सोशल मीडियावरील मानसीचे काही फोटो आणि व्हिडिओ पाहता ती ऐश्वर्याप्रमाणेच दिसत असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे. मानसी यापैकीच एका व्हिडिओमध्ये 'नैनो वाले ने छेडा मनका प्याला'  या गाण्यावर तिच्या अदांनी साऱ्यांना घायाळ करत आहे. मानसी यामध्ये ऐश्वर्याच्या 'जोधा अकरबर' या चित्रपटातील लूकच्या अगदी जवळ जाणाऱ्या रुपात दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळाली आहे. 




दरम्यान, ऐश्वर्याच्या आणि अमुक एका अभिनेत्रीच्या चेहऱ्या बरंच साधर्म्य आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 'लकी- नो टाईन फॉर लव्ह' या चित्रपटात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिची तुलनाही ऐश्वर्याशी करण्यात आली होती.