मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटी फक्त त्यांच्या कलाकृतींमुळेच चर्चेत येतात असं नाही. त्यामागे इतरही बरीच कारणं असतात. अशाच कारणांपैकी एक म्हणजे सेलिब्रिटींची मुलं. सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर प्रकाशझोतात असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या नलांची यादी मोठी असली, तरीही सध्याच्या घडीला चर्चेत असणारी नावं आहेत ती म्हणजे आराध्या बच्चन आणि आझाद राव खान यांची. 


शालेय कार्यक्रमात एका अॅक्टसाठी ते सराव करत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये परफेक्शनिस्ट आमिरच्या मुलाने म्हणजेच आझादने रामाचं पात्रं साकारलं होतं. तर, ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या ही सीतेच्या रुपात सर्वांसमोर आली होती. 


विविध फॅनक्लबतर्फे पोस्ट करण्यात आलेले हे फोटो आणि व्हिडिओ अनेकांचच लक्ष वेधत असून आराध्या आणि आझादवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 




आराध्या आणि आझाद हे दोघंही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. त्यांच्याशिवाय इतरही बरेच स्टारकिड्स या शाळेत शिकतात. त्यामुळे या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे व्हायरल व्हिडिओ हे फक्त सोशल मीड़ियावरच नव्हे तर कलाविश्वातही बरेच गाजतात.