प्रयागराज : काही कलाकार आणि त्यांचा रुपेरी पडद्यावर असणारा वावर हा अनेकांसाठी किंबहुना प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचा असतो. अशा कलाकारांमध्ये सेलिब्रिटी जोड्यांना विसरुन चालणार नाही. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे अशीच चर्चेत असणारी एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. हे दोघंही 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून यंदाच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या चित्रपटाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट कुंभ मेळाव्याच्या अखेरच्या दिवशीच, महाशिवरात्रीचं औचित्य साधत या लोगोचं अनावरण करण्यात आलं. सोशल मीडियावर याविषयीच्या चर्चा जास्त गाजल्या. कारण, जवळपास १५० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात हा लोगो दाखवण्यात आला. या दरम्यान, चित्रपटाचं नावही आकाशात साकारण्यात आलं होतं. आतापर्यंत कधीच एखाद्या चित्रपटाचं नाव किंवा लोगोचं अशा पद्धतीने अनावरण करण्यात आलं नव्हतं. पण, तंत्रज्ञानाची जोड आणि चित्रपटाचं कथानक यांनी सुरेख सांगड घालत खऱ्या अर्थाने आलिया, रणबीर आणि अयान या त्रिकुटाने ही भन्नाट शक्कल लढवली आहे, असंच म्हणावं लागेल. 




चित्रपटाचा लोगो सर्वांच्या भेटीला आणण्याच्या निमित्ताने अयान मुखर्जी यानेही इन्स्टाग्रामच्या विश्वात पदार्पण केलं आहे. त्याने आलिया आणि रणबीरची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं एक ऍनिमेटे़ड पोस्टर त्याने शेअर केलं. 



करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून बिग बी अमिताभ बच्चनही झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी 'ब्रह्मास्त्र' खऱ्या अर्थाने परवणी ठरणार आहे. त्यातही आलिया आणि रणबीर हे गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळ त्यांचं हे नातं रुपेरी पडद्यावर नेमकं यशस्वी ठरतं का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.