Alia Bhatt News : अभिनेत्री (Alai bhatt Dadasaheb Phalke Award) आलिया भट्टचा नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव करण्यात आला. प्रत्येक कलाकाराप्रमाणं आलियाच्या आयुष्यातील हा अतिशय महत्त्वाच्या क्षणांपैकीच एक. पण, या पुरस्काराचा आनंद मात्र तिला फार काळ टिकवून ठेवता आला नाही. कारण काहीतरी अशी घटना घडली ज्यामुळं आलियाता संताप अनावर झाला. तिनं अख्खं घर डोक्यावर घेत थेट पोलीसांचीच मदत घेण्याचं ठरवलं. 


आलियावर कुणीतरी नजर ठेवतंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:च्या घरात असूनही आपल्यावर कुणाचीतरी सातत्यानं नजर आहे, असा सूर आळवत तिनं तीव्र संताप व्यक्त केला. (Alia bhatt instagram) सोशल मीडियाच्या आधारे तिनं लिहिलं, 'तुम्ही थट्टा करताय का? मी स्वत:च्या घरात दुपारी लिविंग रुममध्ये निवांत बसले होते. तितक्यातच मला असं वाटलं की कुणीतरी माझ्याकडे बघतंय, माझ्यावर नजर ठेवतंय. माझी नजर वरच्या दिशेनं गेली आणि मला दोन माणसं दिसली. शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर असणाऱ्या या माणसांकडे असणारा कॅमेरा माझ्याच दिशेनं रोखला होता. कुठल्या जगात हे सर्व करण्याला परवानगी आहे, हे साधारण आहे? हा अतिशय घाणेरडा प्रकार असून एखाद्याच्या गोपनीयतेवर आणि खासगी आयुष्याशी केलेला हल्लाच आहे. एक मर्यादा असते आणि ती तुम्ही कधीही ओलांडणं अपेक्षित नसतं आणि आज मी स्पष्टपणे सांगतेय की आज या सर्व मर्याजा ओलांडल्या गेल्या आहेत.'


हेसुद्धा वाचा : Dadasaheb Phalke Awards: 'Lip Kiss....',आलिया भट्ट आणि रेखा यांचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, पाहा VIDEO


एरव्ही आलिया सोशल मीडियावरील फॉलोअर्स, चाहते किंवा मग माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांशी खेळीमेळीनं वागताना दिसते. इतरांप्रती आपली जबाबदारीसुद्धा ओळखते. पण, इथं मात्र खासगी आय़ुष्यात सातत्यानं कुणीतरी डोकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून तिच्या संतापाचा बांध फुटला आणि तिनं थेट पोलिसांनाच साद दिली. 


आलियावर आलेली वेळ पाहून कलाकारांच्या पायाखालजी जमीन हादरली 


आलियासोबत घडेलला प्रकार पाहिल्यानंतर अभिनेत्री (Anushka Sharma) अनुष्का शर्मानंही, ते पहिल्यांदाच असंकाहीतरी करत नाहीयेत असं म्हणत दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकारही तिच्यासमोर आणला. त्यांचं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हणत तिनंही संतप्त प्रतिक्रिया दिली. 




 
'हे किती लज्जास्पद आहे... एक महिला स्वत:च्याच घरात सुरक्षित नसेल तर ती जाहीर कार्यक्रमांमध्ये काय सुरक्षित असेल हा लांबचाच प्रश्न', अशा आशयाची प्रतिक्रिया देत अभिनेता (Arjun Kapoor) अर्जुन कपूर यानंही आलियाला पाठिंबा देत घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. कलाकारांनाही खासगी आयुष्य असतं हीच गोष्ट गेल्या काही वर्षांमध्ये कुठेतरी हरवताना दिसली आहे. त्यामुळं वारंवार त्यांच्या खासगी क्षणांमध्ये अशा प्रकारची तडजोड होताना दिसते. हे थांबायलाच हवं... नाही का.