alia bhatt pregnent : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनं इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतून आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे. बसला ना धक्का? अर्थात हा सुखद धक्का आहे. कारण, सर्वांची लाडकी जोडी असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्यात आता नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द आलियानंच एक लक्षवेधी पोस्ट करत ही गोड बातमी दिली. 'आमचं बाळ येतंय... लवकरच' असं कॅप्शन लिहित तिनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला. 


या फोटोमध्ये आलिया बेडवर असून तिच्या शेजारी एक पुरुष बसलेला दिसत आहे. तो रणबीर असल्याचा तर्क लावत आलिया सोनोग्राफीसाठी गेल्याच्या क्षणांचा हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. 



14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर साधारण दुसऱ्याच महिन्यात आलियानं केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


काहींनी तर, आलियानं आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही पोस्ट केली असावी असंही म्हटलं. येत्या काळात तिचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरसोबतच ती यामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळं हे चित्रपटाचं प्रमोशनही असू शकतं असं अनेकांचं मत. 


याशिवाय 'डार्लिंग्स', 'इन्शाअल्लाह', 'आशिकी 3', 'तख्त', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'जी ले जरा' हे चित्रपटही तिच्या हाती आहेत. थोडक्यात 2023 पर्यंत ती कामानं व्यापलेली आहे. त्यामुळं ती गरोदर असल्यास या चित्रपटांचं काय होणार हा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. 


तूर्तास मात्र आलियाची पोस्ट पाहता तिच्यावर आणि रणबीवर सेलिब्रिटीही शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.