आज Mobile Tower वाटतं...; अनन्या पांडेची उंची पाहून नेटकरी हैराण, उडवली जोरदार खिल्ली
ananya panday च्या या लूकवरून असंख्य मीम्स आणि विनोदी कमेंट्सना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
Ananya Panday : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडे चित्रपटांपेक्षा इतर मुद्द्यांमुळेच चर्चेत असते. मग ते तिचं एखाद्या अभिनेत्याशी असणारं रिलेशनशिप असो किंवा सहकलाकारासोबतचं नातं. कमी वयातच चर्चेत येणाऱ्या कलाकारांमध्ये आता अनन्याचंही नाव पुढे येत आहे. या अभिनेत्रीचं स्टाईल स्टेटमेंटही या चर्चांमध्ये लक्ष वेधून जात आहे.
अनन्यानं कमी वयातच विविध कारणांनी प्रसिद्धी मिळवली आहे. यावेळी मात्र ती चर्चेत येण्यासाठीचं कारण वेगळं आहे. नुकतीच अनन्या एके ठिकाणहून बाहेर पडताना दिसली. यावेळी ती काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होती. अनन्याचा हा लूक होता तर बराच ट्रेंडी. पण, यात ती जरा जास्तच उंच दिसत होती. (Bollywood Actress ananya panday gets trolled for latest look as she looked very tall watch video)
अधिक वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला....
बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लूक पाहून कोणी तिच्या हाय हील्सकडे लक्ष वेधलं, तर कोणी तिच्या आजुबाजूला असणारी लोकं ठेंगणी असतील असं म्हणत खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 'आज दुग्गल साहब एयरटेल के टावर बने हैं।' अशी कमेंट करत कुणी तिच्यावर उपरोधिक टीका केली, तर ही एकाएकी इतकी उंच कशी झाली, असेही कुतूहलपूर्ण प्रश्न काहींनी विचारले.
कधी एकेकाळी अभिनेता इशान खट्टर (Ishaan Khattar) याच्यासोबत रिलेशनमध्ये असणारी अनन्या सध्या मात्र सिंगलच आहे. या काळात ती अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. 'खो गए हम कहां' या चित्रपटातून ती आगामी काळात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.