दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...

रणवीरचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

Updated: Sep 29, 2022, 11:23 AM IST
दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि पती रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघे ही त्यांच्या करिअरच्या आघाडीवर आहेत. दीपिका आणि रणवीर हे फक्त त्यांच्या करिअरमुळे नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिका यांच्यात खटके उडाल्याचे म्हटले जात आहे. यासगळ्यात एका मुलाखतीत रणवीरनं या सगळ्या चर्चांवर मौन सोडले आहे. 

आणखी वाचा : 'मी बारीक झाले तर…', वाढत्या वजनावर वनिता खरातचं वक्तव्य चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून सतत दीपिका आणि रणवीरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. या दोघांमध्ये दुरावा आला असून त्यांच्यात खटके उडाले आहेत. इतकंच काय तर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटल्याच्या चर्चा ही सुरु होत्या. (Ranveer and Deepika Divorce) दरम्यान, आता रणवीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रणवीर म्हणाला, 'देवाची कृपा आहे… आम्ही दोघं एकमेकांना भेटलो आणि 2012 मध्ये रिलेशनशिपमध्ये आलो आणि आज दहा वर्षांनंतर 2022 पर्यंत आम्ही एकमेकांसोबत आहोत.'

आणखी वाचा : दाक्षिणात्य विरुद्ध बॉलिवूड चित्रपटावर ऐश्वर्या रायचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...

आणखी वाचा : फॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार

रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी या नीट आहेत हे स्पष्ट झालं आहे. या आधी रणवीर आणि दीपिकाचा अवॉर्ड शोमधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीरनं याचं सगळं श्रेय दीपिकाला दिलं होतं. (Everything not okay between Ranveer and Deepika tweet triggers debate on social media actor s new video viral )

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

दरम्यान, दीपिका आणि रणवीर 2018 साली लग्न बंधनात अडकले. त्याआधी जवळपास 6 वर्षं दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. कामाबद्दल बोलायचं झालं तर दीपिका लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त दीपिकाच्या हातात ऋतिकचा ‘फायटर’ हा चित्रपट देखील आहे. रणबीर लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.