मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल लीसा हेडन पुन्हा एकदा आई होणार आहे. लीसा तिचा मुलगा जॅकसोबत अनेक फोटो शेअर करत असते. नुकतंच लीसाने तिच्या बेबी बंपसह फोटो शेअर केला आहे. लीसा नऊ महिन्यांची गर्भवती असून ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते. एक फोटो शेअर करत लीसाने फोटोला 'any day now' असं कॅप्शन दिलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीसा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण तरीही ती तिच्या फिटनेसमुळे, फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. लीसाने आएशा, क्वीन आणि हाऊसफुल ३ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. लीसाने 'इंडियाज टॉप मॉडेल' या रिऍलिटी शोमध्ये जज म्हणूनही काम पाहिलं आहे. 




लीसाची आई ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. तर वडील तमिळ आहेत. भारतात मॉडेलिंग करण्याआधी लीसा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत राहत होती. लीसाचं नाव एलिजाबेश मेरी हेडन असं आहे. 


लीसा २०१६च्या ऑक्टोबरमध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत विवाहबंधनात अडकली. थायलंडमध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मे २०१७ मध्ये लीसाने तिच्या पहिल्या मुलाला जॅकला जन्म दिला. मुलगा आणि पतीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.