`या` अजब-गजब सवयींपुढे बॉलिवूड अभिनेत्री हतबल!
सवयी कधीच आपल्याला सोडत नाहीत. आपल्यालाच त्यांना सोडावे लागते.
मुंबई : सवयी कधीच आपल्याला सोडत नाहीत. आपल्यालाच त्यांना सोडावे लागते. या सवयी सामान्य माणसांनाच असतात असे नाही तर या सवयींपुढे बॉलिवूड स्टार्सलाही हार मानावी लागते. तर पाहुया बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना कोणत्या अजब गजब सवयी आहेत...
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला अशुद्ध वातावरण अजिबात आवडत नाही. ती जिथे कुठे जाईल तिथले आजूबाजूचे वातावरण नेहमी स्वच्छ, प्रसन्न असावे, असे तिला वाटते.
हॉट अभिनेत्री सनी लियोनीची एक सवय तर अजबच आहे. तिला दर १५ मिनिटांना पाय धुवायची सवय आहे.
बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राला शूज घालण्याचा खूप शौक आहे. तिच्याकडे सुमारे ८० जोडी शूज आहेत. त्यामुळे ती जगभरात कुठेही गेली तरी शूज जरुर खरेदी करते.
करिना कपूर आपल्या फिगरबद्दल अतिशय जागरुक आहे. त्यासाठी ती नेहमी आपली फिगर परफेक्ट कशी राहिल याकडे लक्ष देत असते. शरीराचा आकार बिघडलेला तिला अजिबात आवडत नाही.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला घरातील वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या आवडत नाही. घरी, नातेवाईकांकडे कुठेही गेल्यावर जर तिला वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या तर ती लगेचच त्या नीट सुव्यवस्थित ढंगात लावते.