Aww…. ‘तो’ क्षण जेव्हा विराट अनुष्कासमोर ढसाढसा रडलेला....
अनुष्का आणि विराटकडे अनेक प्रेमी युगुलं आदर्श म्हणूनही पाहतात.
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या जोडीकडे सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीची जोडी म्हणून पाहिलं जातं. एकमेकांवर प्रेम करण्यापासून ते अगदी एकमेकांच्या अडीअचडणीत साथ देत महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंत प्रत्येक वेळी अनुष्का आणि विराटनं एकमेकांना साथ दिली. (Anushka sharma Virat kohli)
वर्षांच्या सिक्रेट रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अनुष्का आणि विराटकडे अनेक प्रेमी युगुलं आदर्श म्हणूनही पाहतात.
हे नातं कायमच एकमेकांची ताकद होऊन सर्वांसमोर आलं. पण, या नात्याची भावनिक बाजू तुम्ही कधी पाहिलीये का? विराट अनुष्काला स्वत:च्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान देतो. एका मुलाखतीतच त्यानं सांगितलेलं की, मोहाली कसोटीच्या वेळी अनुष्का त्याच्या सोबतच होती.
त्याचवेळी विराटची कसोटी क्रिकेटच्या कर्णधापदी निवड करण्यात आली होती. मेलबर्न दौऱ्यासाठी त्याच्या खांद्यांवर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती, तोच क्षण होता जेव्हा विराट अनुष्कासमोर ही बातमी ऐकून ढसाढसा रडला होता.
नात्याची नाव आयुष्याच्या या समुद्रात वादळांच्या लाटांवरही आदळली, पण विराट आणि अनुष्का या दोघांनीही या नावेला पैलतीरी नेत एका सुंदर नात्याची सुरुवात केली.
पॉवर कपल, अशी ओळख असणाऱ्या या जोडीच्या नात्यात एका चिमुकलीचीही एंट्री झाली. वामिका, असं विरुष्काच्या लेकिचं नाव. तिच्या येण्यानं हे कुटुंब पूर्ण झालं आणि विराटच्या खात्यात आणखी एका नव्या जबाबदारीची नोंदही झाली.