Bhumi Pednekar : मोलकरणीसोबत घरमालक इंटिमेट; अंगावर इतके कमी कपडे पाहून भूमी पेडणेकर अवघडली
Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनंसुद्धा काही कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन दिले. त्यातही `लस्ट स्टोरीज` (Lust Stories) या सीरिजमधील तिचे इंटिमेट सीन प्रचंड गाजले.
Bhumi Pednekar Bold Scenes in Lust Stories: गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी कलाजगत आणि वेब सीरिज (Hindi Webseries) विश्वात कथानकाच्या आवश्यकतेनुसार दिग्दर्शक काही स्वातंत्र्य घेऊ लागले आहेत. मग ते चित्रपटाच्या पटकथेमध्ये असो किंवा एखाद्या दृश्यामध्ये असो. कथानकाच्या गरजेनुसार कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन (Bold Scenes) अर्थात प्रणयदृश्यांच्या प्रमाणातही वाढ झाली. अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिनंसुद्धा काही कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन दिले. त्यातही 'लस्ट स्टोरीज' (Lust Stories) या सीरिजमधील तिचे इंटिमेट सीन प्रचंड गाजले. किंबहुना त्यांची बरीच चर्चा झाली.
इंटिमेट सीनविषयी काय म्हणाली भूमी? (Bhumi Pednekar intimate scene in lust stories)
झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित या वेब सीरिजबद्दल सांगताना भूमीनं आपण एका मोलकरणीची भूमिका साकरल्याचं सांगत त्यामध्ये घरमालकाच्या भूमिकेत असणाऱ्या नील भूपालमसोबत इंटिमेट झाल्याचं सांगितलं. याविषयी सांगताना ती म्हणाली, 'लस्ट स्टोरीजच्या वेळी मी प्रचंड अवघडले होते. कारण चित्रीकरणावेळी तिथं इंटिमसी कोऑर्डीनेटर नव्हते.'
इंटिमेट सीनच्या आधी झोयानं भूमीला अवघडलेलं पाहून नील आणि तिला एका बाजुला नेलं आणि सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. पण, आपल्या शरीरावर इतके कमी कपडे, समोर असणारी इतकी माणसं पाहून भूमीला प्रचंड अवघडलेपणा वाटत होता. एक अभिनेत्री म्हणून भूमीसाठी हा आव्हानात्मक प्रसंगच होता असं म्हणायला हरकत नाही.
इंटिमसी कोऑर्डीनेटरचं काम असतं तरी काय?
ही मंडळी चित्रपट, मालिका, वेह सीरिजमधील इंटिमेट दृश्यांमध्ये मोलाचा हातभरा लावतात. कथानक आणि दृश्याचा प्रसंग समजून घेऊन त्यानंतर कलाकारांच्या मर्यादा ते जाणून गेतात. एखाद्याच्या स्पर्शामुळं तुम्हाला संकोचलेपणा तर वाटत नाही, अशा प्रश्नांपासून याची सुरुवात होते. भारतामध्ये मर्यादांमध्येच राहून दिग्दर्शकाला अपेक्षित दृश्य साकारून देण्याची जबाबदारी या इंटिमसी कोऑर्डीनेटरवर असते. इथं पडद्यावर दिसणाऱ्या दोन व्यक्तींचा किंवा कलाकारांचा एकमेकांवर असणारा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो.
भूमीचे आगामी प्रोजेक्ट..
'गोविंदा मेरा नाम' या अपयशी चित्रपटानंतर आता भूमी तिच्या करिअरला एक नवं वळण देण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काळात ती 'द लेडी किलर', 'अफवाह' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यामुळं तिला प्रेक्षकांची पसंती मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.