मुंबई : एका आईसाठी तिच्या पोटी जन्मलेल्या बाळाचं महत्त्वं हे सर्वतोपरी अग्रस्थानी असतं. त्या बाळासाठीही आई काही म्हणजे काहीही करण्यासाठी तयार होते. बाळापासून क्षणभराचाही विरह तिला सहन होत नाही. अशातच Bollywood बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिला मात्र तिच्या बाळापासून आयुष्यभरासाठी वेगळं व्हावं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुळ्या मुलांपैकी एकाच्या निधनामुळं सेलिना गेल्या काही दिवसांपासून बरीच हताश आणि हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्ल्ड प्रीमेच्योर डे  (World Prematurity Day) च्या निमित्तानं तिनं सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या दु:खाला शब्दांच्या मदतीनं वाट मोकळी करुन दिली. आपल्या मुलांसमवेत तिनं फोटोही शेअर केला. 


प्रसूती काळापूर्वीच जन्मणाऱ्या बाळांबाबत तिनं चर्चा व्यक्त करत आपल्या मुलासाठी इतरांनी प्रार्थना करावी अशी विनंती केली. वेळेच्या आधीच जन्मणाऱ्या बाळाला धओका असला तरीही त्यामध्ये आशेचा एक किरण मात्र असतो असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


बाळाला वेदनांशी लढा देताना पाहिलं.... 


आपल्या बाळाविषयी सांगताना सेलिना लिहिते, 'आम्ही आपल्या एका बाळाला NICU मध्ये हृदयाच्या वेदनांशी लढा देताना पाहिलं तर, दुसऱ्याचे अंत्यविधी केले. पण, आपण अवघ्या एका आशेवरच जगत असतो. एनआयसीयूतील डॉक्टर आणि परिचारिकांनी अविरतपणे उत्तम काम केलं. आमचा मुलगा आर्थर आमच्यासोबत घरी यावा यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. अनेक लहान मुलं आजही उपचारांदरम्यान अडचणीत येतात. काही त्यातूनच मोठे होत सावरतात, काही त्यातूनच विन्सटन चर्चिल आणि अल्बर्ट आईनस्टाईनसारखे प्रख्यात होतात. आमचा मुलगा आर्थर हासुद्धा त्यातीलच एक आहे'. 



 


गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर राहणारी अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या कुटुंबावरच लक्ष देत आहे. त्यातच तिची ही पोस्ट पाहून अनेकांनीच या अभिनेत्रीचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.