ना मल्लिका, ना माधुरी... `या` अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता.
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड असो किंवा साउथचे चित्रपट असो सिनेमात हल्ली किसिंग सिन असणे सामान्य झालं आहे. मात्र पूर्वी लिपलॉक सिन म्हणजे वाद ठरलेला असायचा. एका अभिनेत्रीला चित्रपटात दिलेल्या किसिंग सिनमुळं थेट कायदेशीर नोटिस आल्याचा खुलासा तिने केला आहे. तसंच, तेव्हा या किसिंग सिनच्या चर्चादेखील झाल्या होत्या. या चित्रपटात अभिनेत्रीच्या पतीनेच मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, तरीदेखील चर्चा रंगली ती तिच्या लिपलॉक किसची.
गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य चर्चेत आहे. ही अभिनेत्री आहे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल सध्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनीही घटस्फोट घेतल्याच्या चर्चा असताना अद्याप बच्चन कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याने दिलेल्या एका लिपलॉक सीनची चर्चा आहे. या लिपलॉक सीनमुळं ती वादात सापडली होती.
धूम 2 या चित्रपटात ऐश्वर्याने भूमिका साकारली होती. ऐश्वर्या आणि हृतिक रोशनच्या जोडीला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. मात्र, अभिनेत्रीने 2012मध्ये म्हटलं होतं, ऋतिक रोशनसोबत लिपलॉक सीन दिल्यामुळं तिला लीगल नोटिस देण्यात आली होती. लोकांनीदेखील या सिनवर रिअॅक्ट केलं होतं. ऐश्वर्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'मी धूममध्ये एक किसींग सिन दिला होता. ज्याची खूप चर्चा झाली होती. मी खूप वैतागले होते. मला देशातील काही लोकांनी कायदेशीर नोटिसदेखील बजावल्या होत्या.'
2 सेंकदाच्या सीनवरुन टीका
ऐश्वर्या राय देशातील मुलींसाठी एक आयकॉन आहे. लोकांनी तिला म्हटलं होतं की, या आधी तु इंटिमेंट सीन देण्यास नकार देत होती. मग आता असे सीन देण्यास का तयार झाली? असा प्रश्न लोकांनी तिला केला होता. तिने पुढे म्हटलं आहे की, 'ती चित्रपटात इंटिमेट सीन देण्यास अद्यापही तयार नाही. मी फक्त एक कलाकार आहे. माझं काम करत आहे आणि 3 तासांच्या चित्रपटात 2 सेकंदाच्या सीनसाठी माझ्याकडून उत्तर मागण्यात आलं.'
ऐश्वर्या रायने जेव्हा धूम 2मध्ये काम केलं होतं. तेव्हा जगभरात त्याची चर्चा झाली होती. ऐश्वर्याला हॉलिवूडमधूनही ऑफर होती. मात्र या चित्रपटात किसिंग आणि इंटिमेट सीन असल्याकारणामुळं तीने हे चित्रपट नाकारले होते. मात्र त्यानंतर ऐश्वर्याने शब्द, ए दिल हे मुश्कील चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. मात्र सध्या अभिनेत्री तिच्या घटस्फोटाच्या अफवांवरुन चर्चेत आहे.