Fatima Sana Sheikh : बॉलिवूड... एक अशी दुनिया जिथल्या झगमगाटाचा अनेकांनाच हेवा वाटतो. इथं मिळणारी प्रसिद्धी आणि श्रीमंती पाहून आपण इतकं श्रीमंत असायला पाहिजे अशा इच्छाही अनेकजण व्यक्त करतात. पण, याच बॉलिवूडचा एक वेगळा चेहराही आहे, जो फार क्वचितच आपल्या समोर येतो आणि जेव्हा येतो तेव्हा आपण पुरते हादरून जातो. कलाजगताचा असाच चेहरा आपल्यासमोर आणला आहे 'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिनं. तिच्या वाट्याला आलेली गरिबी पाहून काही क्षणांसाठी तुमचाही विश्वास बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चाची 420' या चित्रपटातून बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेल्या फातिमानं विविध भूमिकांच्या बळावर कमालीची प्रसिद्धी मिळवली. आमिर खान आणि सान्या मल्होत्रा यांच्यासोबत तिनं Dangal चित्रपटात स्क्रीन शेअर केली आणि इथंच तिच्या अभिनयाच्या करिअरला नवी कलाटणी मिळाली. फातिमानं चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करत तिच्या अभिनयाचा उत्तम दर्जाच सर्वांपुढं सादर केला. असं असलं तरीही संघर्ष तिलाही चुकलेला नाही. 


आजही भाड्याच्या घरात राहतेय... 


फातिमानं प्रचंड प्रसिद्धी मिळवली, श्रीमंतीही आता तिच्यासाठी नवी नाही. पण, हीच फातिमा आता तिच्या संघर्षाच्या दिवासांना आठवून काहीशी भावूक झाली. Humans of Cinema शी संवाद साधताना तिनं आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याचं सांगत तिनं स्वत:च्या घराचं वास्तव सर्वांपुढे आणलं. आजही भाड्याच्या घरात राहतेय... असं म्हणत एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या 1 BHK घराचाही तिनं इथं उल्लेख केला. 


स्वत:चा अभिमान असल्याचं म्हणताना तिनं आपण आजही स्वत:चं घर खरेदी केलं नसून, किमान जिथं राहत होतो त्याहून चांगल्या ठिकाणी राहत असल्याचं समाधान व्यक्त केलं. हे सर्वकाही सांगत असताना संघर्ष अजूनही संपलेला नाही हेसुद्धा तिनं स्पष्ट केलं. 


हेसुद्धा वाचा : दादा कोंडके यांच्या विनोदाची होणार बरसात, 'या' दिवसापासून दर रविवारी फक्त झी टॉकीजवर



सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप काही ऐकावं लागलेलं... 


करिअरच्या अगदीच सुरुवातीच्या दिवासांमध्ये फातिमानं एका टीव्ही मालिकेमध्येही काम केलं होतं. त्यावेळी तिला तिच्या स्क्रीप्टमधील काही ओळी लक्षात राहात नव्हत्या, त्याचवेळी दुसऱ्या मेकअप रुममधून एका दुसऱ्या अभिनेत्रीनं, 'येsss...ये चाची 420 मे थी? इसको डायलॉग बोलना नही आता' असा उपरोधिक सूर आळवला आणि तिथंच फातिमा कोलमडली. आपण ज्या वयात होतो त्या वयात, करिअरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं काहीतरी ऐकणं म्हणजे खच्चीकरणच आहे असं म्हणताना आपणही या साऱ्याचा सामना केल्याचं म्हणत तिनं स्वत:लाच धीर दिला. एक अभिनेत्री म्हणून संघर्षाची वाट चालणारी हीच फातिमा आता या मायानगरीमध्ये स्वत:चं घर घेण्याचं स्वप्नही पाहतेय... तिच्या या स्वप्नासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा!