मुंबई : एकिकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे रणवीर- दीपिकाच्या लग्नाच्या चर्चा, असंच सारं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोघांच्याही कुटुंबांमध्ये लगीनघाई पाहायला मिळत असून त्यातूनच वेळ काढत दीप-वीरने एका खास व्यक्तीची भेट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड कारकिर्द आणि खासगी आयुष्य अशा दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून दीपिका आणि रणवीला साथ देणारी, सदैव त्यांच्या पाठिशी उभी असणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. 


दिवाळीच्या मुहूर्तावरच लगीनघाईत रमलेल्या दीपिका आणि रणवीरने वेळात वेळ काढून भन्साळी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.


लग्नाचं आमंत्रण देण्यासाठीच ते 'राम-लीला' भन्साळींच्या घरी पोहोचल्याचं कळत आहे. 


त्यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या तीन चित्रपटांतून दीपिका आणि रणवीर झळकले. मुख्य म्हणजे या तिन्ही चित्रपटाने त्या दोघांच्या कारकिर्दीला वेगळीच कलाटणी दिली. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो किंवा एखादा चॅट शो प्रत्येक ठिकाणी ही जोडी भन्साळींप्रती असणारी कृत्ज्ञता व्यक्त करण्यास विसरत नाही. 


दरम्यान, भन्साळींनी दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळाल्यास ते या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार का?,  हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे.


इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीपिका आणि रणवीर सहजीवनाची शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय खासगी स्वरुपात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून, मोजक्या पाहुण्या मंडळींनाच या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.