मुंबई : अखेर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. चाहत्यांनी, कुटुंबियांनी आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानत या दोघांनीही १४ आणि १५ नोव्हेंबरला आपला विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इटलीतील लेक कोमो येथे या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा पार पडणार असून, काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 


सिंधी विवाह पद्धतींनुसार दीपिका आणि रणवीर लग्नगाठ बांधणार असल्याचं कळत आहे. त्याशिवाय लग्नाच्या आधी दीपिकाच्या कुटुंबियांकडूनही काही रुढी- परंपरांनुसार विधी पार पडणार आहेत. 


नंदी पूजा- 


दीपिका- रवीरच्या लग्नाच्या दहा दिवस आधी दीपिकाची आई बंगळुरूमध्ये नंदी पूजेचं आयोजन करणार असल्याचं कळत आहे. हिंदू मान्यतेनुसार नंदी, शंकराचं वाहन असल्यामुळे तो शंकरापर्यंत भक्तांच्या मनोकामना पोहोचवण्यात मदत करतो. 


सिंधी चालीरिती-


रणवीर सिंह भवनानी असं रणवीरचं संपूर्ण नाव आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नापूर्वी एक वेगळाच विधी रणवीरला पार पाडावा लागणार आहे. ज्याचं नाव आहे सांथ.


अनेक वर्षांपासून सिंधी समाजात प्रचलित असलेल्या या प्रथेनुसार नातेवाईक नवरदेवाचे कपडे फाडतात. अनेकदा सोशल मीडियावर किंवा एखाद्या चित्रपटातून ही प्रथा तुम्ही पाहिली असेलच. या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या निमित्ताने करण्यात आलं आहे. तेव्हा आता येत्या काळात त्यांच्याच विवाहसोहळ्याची रंगत हिंदी कलाविश्वात पाहायला मिळणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.