मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती, अभिनेता रणवीर सिंग यांनी नुकतीच बंगळुरू येथील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. उर्वशी केशवानी हिच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी म्हणून दीपिका आणि रणवीरने त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला होता. लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांपासून ते अगदी मुख्य सोहळ्यापर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त दीपिकाच नव्हे, तर तिचे कुटुंबीयसुद्धा या सोहळ्यात अनेकांचं लक्ष वेधून गेले. दीपिका, तिची बहीण अनिशा आणि आई यांचा पेहराव यावेळी विशेष आकर्णाचा विषय ठरला. स्टायिश पण, तितकाच पारंपरिक बाज या तिघींच्याही पेहरावात पाहायला मिळाला होता. 


छाया सौजन्य- इन्स्टाग्राम 

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम 

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम 

प्री- वेडिंग पार्टीसाठी दीपिकाने सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केलेला काळ्या रंगाचा शरारा घातला होता. त्यासोबत जाळीदार दुपट्टयाची जोड़ देत तिचा हा लूक पूर्ण होत होता. दीपिकाने नेहमीप्रमाणेच गळ्यालगत असणाऱ्या 'चोकर' या पद्धतीच्या नेकलेसची जोडही या लूकमध्ये दिली होती. तर, अनिशा रुंद, सोनेरी जर असणाऱ्या सलवार- सुटमध्ये दीपिकाच्या स्टाईल स्टेटमेंला चांगलीच साथ देत होती. 



छाया सौजन्य- इन्स्टाग्राम 

प्री- वेडिंग समारंभांमध्ये आपल्या लूकने उपस्थितांचं लक्ष वेधणाऱ्या दीपिका, तिची आई आणि तिच्या बहिणीने लग्नाच्या मुख्य सोहळ्यासाठीसुद्धा अशाच सोबर पेहरावाला पसंती दिली होती. मुख्य विवाहसोहळ्यासाठी दीपिकाने सोनेरी रंगाची साडी आणि त्याला साजेशे दागिने घातले होते. तर, तिच्या बहिणीनेही अशाच पेहरावाला पसंती दिली होती. संपूर्ण विवाहसोहळ्यात दीपिकाचा वावर पाहता, अनेकांनाच तिच्या या वर्तणुकीचा हेवा वाटला.