मुंबई : 'ओम शांती ओम'  या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने पाहता पाहता बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'कॉकटेल' म्हणू नका, 'ये जवानी है दिवानी' म्हणू नका किंवा मग 'पद्मावत' म्हणू नका. प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण, खरेपण जपत तिने आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका कायमच तिच्या या व्यग्र कामातून या वर्तुळातील मंडळींशी अगदी खेळीमेळीने वावरत असते. कधी कोणा छायाचित्रकारासोबत गप्पा मारणं असो किंवा मग कोणा एक पत्रकाराला आपुलकीने अमुक एका गोष्टीविषयी विचारणं असो. हाच हटके आणि दिलखुलास अंदाज दीपिकाला सर्वांच्या आवडीची अभिनेत्री बनवण्यामागचं एक कारण ठरतो. या अभिनेत्रीचा असाच एक अंदाज सध्या पाहायला मिळाला. 


Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच


 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दीपिका आणि तिची एक झलक टीपण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करणाऱ्या छायाचित्रकारांचं अनोखं नातं सर्वांपुढे येत आहे. दीपिकाचे फोटो टीपत असतानाच छायाचित्रकारांच्या गर्दीतून दीपिकाला कोणीतरी दीपू जी अशी हाक मारली. यावेळी तिला हसूच आवरता आलं नाही. त्यामुळे दीपू जी असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमचलं. ज्यानंतर दीपिकाने जे केलं ते पाहता तिच्याली विनोदी बाजू सर्वांपुढे आली. 



दीपू जी म्हणणाऱ्या छायाचित्रकाराला दीपिकाने त्याचं नाव विचारलं. त्यावर त्याने आपलं नाव पांडे असल्याचं सांगितलं. त्याने आपलं नाव सागताच दीपिकाने त्याला पांडू जी म्हणून संबोधलं आणि ती कारमध्ये जाऊन बसली. त्यावेळी तेथे तिचे फोटो टीपण्यासाठी आलेल्यांमध्येही एकच हशा पिकला.