मुंबई : COVID-19 म्हणजेच कोरोना व्हायरसने साऱ्या जगावर दहशत पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण या कोरोनामुळे धास्तावले आहेत. कलाकार मंडळीही यात मागे नाहीत. जिथे कोरोनामुळे अनेक ठिकाणी दिसणारी गर्दीही आता दिसेनाशी झाली आहे, तिथेच भारतीय कलासृष्टीही काहीशी थंडावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी चित्रपट, मालिका, कार्यक्रम या गोष्टींच्या चित्रीकरणाचा वेग मंदावला आहे. काही दिवसांसाठी चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच घरी राहण्याचा सल्लाही जबाबदार व्यक्तींकडून देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोण हीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून गर्दी टाळताना दिसत आहे. 


इतकंच नव्हे, तर दीपिकाने सावधगिरी म्हणून घराबाहेर जाणंही टाळलं आहे. COVID-19मुळे घरात कोंडलेल्या दीपिकाने या वेळेतही एक असं काम हाती घेतलं आहे, जे सहसा करण्यासाठी तिला वेळही मिळत नसावा. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत तिने याविषयीची माहिती दिली आहे. 


गर्दी टाळा असं सांगणाऱ्या प्रशासनाचे आदेश पाळणाऱ्या दीपिकाने हाती घेतलेलं काम म्हणजे कपड्यांचं कपाट लावण्याचं. कपड्यांचा खण नीटनेटका ठेवण्याचं कित्येकदा ठरवूनही वेळेअभावी हे काम काही केल्या अनेकंकडून पूर्ण केलं जात नाही. पण, दीपिकाने मात्र निश्चय करत हे काम हाती घेतलं आणि मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला. 



वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला


सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने बेडवर पसरवून ठेवलेले कपडे स्पष्टपणे पाहता येत आहेत. मुख्य म्हणजे बी- टाऊनच्या या सौंदर्यवतीने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या. शिवाय दीपिकाच्या निमित्ताने आपणही मोकळ्या वेळेत असं काहीतरही काम करायला हरकत नाही, ही कल्पनाही काहींना सुचली. त्यामुळे कोरोनाशी लढणारी दीपिका एका नव्या कारणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून गेली.