मुंबई : कलाकार हे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच त्यांचं सामाजिक भान जपण्यासाठीही ओळखले जातात. कोणाला मदत करणं असो किंवा मग एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणं असो. हे कलाकार सातत्यानं आपली जबाबदारी पार पाडत असतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) हिनंही नुकतंच एक मोठं पाऊल उचललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Acid Attack Survivor Bala) अॅसिड हल्ल्यातील पीडिता, बाला हिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तिला श्वसनात त्रास होत आहे. कौटुंबिक वादामध्ये बालावर अॅसिड फेकण्यात आलं होतं. 12 शस्त्रक्रियांनंतर ती कुठं सावरत होती, नव्यानं एके ठिकाणी कामालाही जात होती. पण, आता मात्र तिचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. 


दीपिका आणि कपिल शर्मा यांच्यासोबतही बालानं काम केलं आहे. सथ्या तिची किडनी निकामी झाल्यामुळं उपचारांसाठी 16 लाख रुपयांच्या प्रतिक्षेत आहे. बालाच्या उपचारांसाठी ती काम करत असणाऱ्या शिरोज हँगाऊट कॅफेकडून क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून हा निधी गोळा करण्यासाठी पावलं उचलली गेली. 


दीपिकापर्यंत जेव्हा ही माहिती पोहोचली तेव्हा तिनं सकाळी 10 लाख आणि सायंकाळी 5 लाख रुपयांची मदत करत आतापर्यंत तब्बल 15 लाख रुपयांची मदत केली. दीपिकानं बालासाठी उचललेलं हे मोठं पाऊल सध्या अनेकांची दाद मिळवून जात आहे. 


दरम्यान, 'छपाक' या चित्रपटातून बालानं अभिनय सादर केला होता. दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून बालानं जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन सर्वांना देऊ केला होता. आता जेव्हा बालाला मदतीची गरज आहे, तेव्हा खुद्द दीपिकानं पुढाकार घेत तिच्या मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.