Deepika Padukone Hospitalized : अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉस्पिटलमध्ये दाखल
Deepika Padukone Hospitalized : दीपिकासोबत याआधीही असं घडलं होतं. त्यामुळे चाहते तिच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत आहेत.
Deepika Padukone complains of uneasiness : मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) काल (26 सप्टेंबर) रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपीकाला अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीपिकासोबत याआधीही असं घडलं होतं. त्यामुळे चाहते तिच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत आहेत. (bollywood actress deepika padukone hospitalized due to uneasiness)
रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची प्रकृती आता स्थिर आहे. दीपिकाने 12 तासांत आवश्यक त्या सर्व टेस्ट (Medical Test) केल्या. त्यामुळे दीपिकाला त्या क्षणीच एडमीट करण्यात आलं.
आता तब्येत कशी आहे?
दीपिकाच्या टीमकडून तब्येतीबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच तब्येतीबाबत कोणतही विधान करण्यात आलंय. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाची प्रकृती सध्या स्थिर आहे. दीपिका रुग्णालयात असल्याने तिच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दीपिकाला अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ही त्याला हॉस्पीटमध्ये नेण्यात आलं होतं. दीपिकाला काही महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये हॉस्पीटमध्ये नेलं होतं. दीपिका तेव्हा प्रभाससोबत एका प्रोजेक्टवर काम करत होती. तेव्हा दीपिकाला जवळपास अर्धा दिवस वैद्यकीय पथकाच्या देखरेखाली ठेवण्यात आलं होतं.