कायम आनंदात असणाऱ्या दीपिकाला असं काय झालं, की स्वत:चाच राग करु लागली ती?
दीपिकाला स्वत:च्याच काही गोष्टी खटकत होत्या, वेळीच पटत नव्हत्या आणि रागही येत होता.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच तिच्या चित्रपटांसाठी आणि कलाविश्वात असणाऱ्या तिच्या स्थानासाठी ओळखली जाते. सुरुवातीचं मॉडेलिंग आणि त्यानंतर चित्रपटांमधली कारकिर्द पूर्ण करत या अभिनेत्रीनं कमालीची लोकप्रियता मिळवली. (deepiak padukone)
नुतक्याच प्रदर्शित झालेल्या 'गहराईयां' Gehraiyaan या चित्रपटातूनही ती चाहत्यांच्या भेटीला आली.
एकिकडे जाईन तिथे यश मिळवेन अशाच ऐटीत दीपिका पुढे जात असताना दुसरीकडे मात्र तिच्या या नव्या चित्रपटाला मात्र फारसा चांगा प्रतिसाद मिळाला नाही.
त्यातच म्हणे दीपिकाला स्वत:च्याच काही गोष्टी खटकत होत्या, वेळीच पटत नव्हत्या आणि रागही येत होता.
दीपिकाला खटकणाऱ्या या काही गोष्टी होत्या तिनंच साकारलेल्या 'अलिशा' या भूमिकेतील.
एका मुलाखतीत ती म्हणाली, हे सर्वकाही निरीक्षण करण्याजोगं होतं.... प्रत्येक व्यक्तीनुसार सर्वांनाच ते पात्र (अलिशा) आवडेलच असं नाही. ती जे काही करतेय ते या पात्राची गरज आहे. पण, तिचं अस्तित्वं नाकारलं जावं असंही होत नाही.
अलिशा साकारणाऱ्या दीपिकानं सर्वजण तिच्या मताशी सहमत असतील किंवा असावच असंही नाही, हा विचारही समोर ठेवला.
आपण साकारलेल्या भूमिकेच्या बाबतीत संताप, राग किंवा इतर भावना असल्या तरीही इथं मात्र लगेचच अंदाज बांधणं चुकीचं ठरेल. अथं एक व्यक्ती म्हणून पाहणं आणि निभावणं महत्त्वाचं असेल, असा विचार तिनं समोर ठेवला.
दीपिका कॅमेऱ्यासमोर जरी कितीही हसरी असली तरीही तिच्या मनात असणारी ही खदखद अखेर बाहेर आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.