दीपिका म्हणते `या` कारणांमुळे मी रणवीरच्या प्रेमात
तिने स्पष्ट केली ही कारणं
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाच्या तारखा जाहीर केल्या आणि सर्वत्र या सेलिब्रिटी जोडीच्याच लग्नाच्या चर्चा पाहाला मिळाल्या. या चर्चांमध्ये अधिक रंगत आणली ती म्हणजे 'कॉफी विथ करण' या चॅट शोने. करण जोहरच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, पहिल्याच भागामुळे करणचा हा अफलातून चॅट शो आकर्षणाचा विषय ठरला आहे.
या चॅट शोच्या पहिल्या भागासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांची उपस्थिती होती. यावेळ दीपिका आणि आलियाने दिलखुलास गप्पा मारल्या. पण, त्यातही विशेष लक्षवेधी ठरली ती म्हणजे बी- टाऊनची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण.
करणच्या प्रश्नांना उत्तरं देत दीपिकाने यावेळी आपल्या खासगी आयुष्याविषयीही भाष्य केलं. रणवीर सिंगवर आकंठ प्रेम करण्याची कारणंही यावेळी तिने स्पष्ट केली.
करणने मोठ्या चतुराईने रॅपिड फायर राऊंडमध्ये दीपिकाला रणवीरविषयीचे काही प्रश्न विचारले.
टतू रणवीरच्या कोणत्या गोष्टीच्या प्रेमात आहेस?', ;त्याची कोणती गोष्ट तुला आवडत नाही?' आणि 'कोणती गोष्ट तू मनाविरुद्धही सहन करतेस?', असे प्रश्न तिला विचारण्यात आले.
करणच्या या प्रश्नांचं उत्तर देत दीपिका म्हणाली, 'मी रणवीरवर प्रेम करते ते म्हणजे त्याच्या भावनाप्रधान स्वभावासाठी.
कोणत्याही गोष्टीप्रती त्याची व्यक्त होण्याची पद्धत ही अतिशय सुरेख आहे, असं ती म्हणाली.
रणवीरबाबत न आवडणारी गोष्ट सांगतेवेळी तिने त्याच्या जीवनशैलीचा उल्लेख केला. तर त्याचा आगलावेगळा फॅशन सेन्स हा मनाविरुद्ध आपण सहन करतो, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं.
रणवीरविषयी दीपिकाने केलेली ही वक्तव्य आणि त्यांच्या नात्याचे अनोखे बंध पाहता खरंच या जोडीवर प्रेक्षकांचं इतकं प्रेम का आहे, हे स्पष्ट होत आहे.