मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानं साऱ्या कलाविश्वाला वेड लावलं होतं. इटलीमध्ये लेक कोमो येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. आजही दीप-वीर च्या लग्नाचे फोटो पाहिले, की त्या सोहळ्यामध्ये असणारं सौंदर्य नजरेसमोर येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीतील दोन प्रकारचे विवाहसोहळे आणि त्यानंतर मुंबईत दोन जंगी पार्टी ही सर्व आखणी करण्यासाठी दीपिकानं स्वत:ला झोकून दिलं होतं. 


लग्नसोहळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिपूर्णच असावी, यासाठी दीपिका आग्रही होती, असं रणवीरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.


यासाठी लग्नातील दागदागिन्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच दीपिकानं बारकावे टीपत निवडलं होतं. लग्नसोहळ्याची आखणी अशी काही सुयोग्य करण्यात आली होती, की या दोन्ही कलाकारांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.


वेडिंग प्लॅनर वंदना मोहनची मदत घेत दीपिकानं हे सारं साध्य केलं होतं. 


लग्नासाठी कोणती थीम हवी आहे, कोणत्या गोष्टी हव्या आहेत आणि कोणत्या नकोयत हे सारं तिनं ठरवलं होतं. ज्यामुळं गोंधळाची परिस्थिती आली नाही. 


दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची संकल्पना आधीच स्पष्ट होती. हा सोहळा कसा असावा हेसुद्धा या जोडीनं ठरवलेलं होतं. ज्यामुळं मतभेदही झाले नाहीत. 


तुम्हीही लग्न किंवा तत्सम सोहळ्याची आखणी करणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्वनिोजित आखणी कधीही अनेक कामं सोपी करते. 


आपल्याला काय हवं आणि काय नको याबाबतची स्पष्टोक्ती असल्याच आयत्या वेळी काय करावं आणि काय करु नये हे प्रश्नच उदभवत नाहीत.