Deepika Padukone Taxi Ride : सेलिब्रिटी मंडळी म्हटलं की, त्यांच्या अवतीभोवती असणारा चाहत्यांचा गराडा, अनेकदा विनाकारणच होणारी गर्दी, त्या गर्दीतून या मंडळींना वाट काढून देणारे त्यांचे बॉडीगार्ड असं काहीसं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. थोडक्यात सेलिब्रिटी एखाद्या ठिकाणी जाणार म्हणजे त्यांच्यासोबतचा लवाजमाही तिथं आलाच, हे अलिखीत समीकरण. पण, काही लोकप्रिय चेहरे मात्र याला अपवाद ठरतात. त्यातचाल एक चेहरा म्हणजे, दीपिका पदुकोणचा. (Bollywood Actress Deepika padukone takes a taxi ride in mumbai enjoyes ice cream watch photos )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोणनं फार कमी वेळातच हिंदी कलाजगतात नाव कमवलं. जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ ही अभिनेत्री हिंदी चित्रपटविश्वावर अधिराज्य गाजवताना दिसतेय. नव्या अभिनेत्रींचं आव्हानही स्वीकारतेय. या साऱ्यामध्ये तिच्या चाहत्यांच्या आकड्यात होणारी वाढ कौतुकास्पद. ही दीपिका अनेक चाहत्यांच्या काळजाता ठाव घेणारी. तिचं नुसतं स्मितहास्यही एखाद्याच्या आयुष्यावर हळुवार फुंकर घालते. हीच दीपिका हल्लीकडेच इतक्या गर्दीतून एकट्यानंच वावरत होती म्हणे की तिला कोणीच ओळखलं नाही. 


दीपिका मुंबईत भटकंतीसाठी निघते तेव्हा... 


दीपिकाला कोणी ओळखलं नाही हे आम्ही नाही, तिचाच व्हिडीओ सांगून जात आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीनं नुकताच एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला. फोटो पाहताना ती दक्षिण मुंबईतील के. रुस्तम्स या आईस्क्रिमच्या प्रसिद्ध दुकानाबाहेर असल्याचं लक्षात येतं. त्याआधीच दीपिकानं एक व्हिडीओही शेअर केला आहे. जिथं ती चक्क एका टॅक्सीनं शहरात फिरताना कळत आहे. 


हेसुद्धा पाहा : Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य


 


रात्री उशिरानं मुंबईच्या रस्त्यांवर ही अभिनेत्री तोंडावर मास्क लावून निघाली आणि तिला कोणीच ओळखलंही नाही. अगदी ती ज्या टॅक्सीमध्ये होती तो टॅक्सीचालकही तिला ओळखू शकलेला नाही हेच तिच्या व्हिडीओतून लक्षात येत आहे. बरं, याचा तिला झालेला आनंदही काही औरच. धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत दीपिकानं तिच्या परीनं आयुष्यातील या लहानसहान पण तितक्याच आनंददायी क्षणांचा अनुभव घेतला. बघा हं... त्यादरम्यान तुम्हीही दक्षिण मुंबईत वगैरे आला असाल तर शेजारच्याच टॅक्सीत दीपिका होती बरं... काही लक्षात येतंय का? 



दीपिकाची ही पोस्ट पाहता पाहता ती नेमकी केव्हा कुठं गेलेली याचा अंदाज लावा आणि पुढच्या वेळी ती दिसेल अशी आशाही बाळगा.....