मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' Chhapaak या तिच्या आगामी  चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. विक्रांत मेसीसोबत  पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या दीपिकाच्या या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चा सुरु झाली आहे. एका ऍसिड हल्ला पीडितेचा संघर्ष आणि समाजाची या साऱ्यामध्ये असणारी भूमिका असे मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. अशा या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दीपिकाला तिच्या भूमिकेशी एकरुप होताना काही आव्हानांचाही सामनाही करावा लागला. ज्यामध्ये तिला पुन्हा एकदा नैराश्याचा सामना करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव मसंद यांच्यासोबतच्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाने याविषयीचा खुलासा केला. 'चित्रपटाच्या सेटवर मला माझ्या समुपदेशकांची गरज भासू लागली होती', असं म्हणज आपण पुन्हा एकदा नैराश्याचा सामना करण्याच्या परिस्थितीत गेल्याचं ती म्हणाली. भावनिकदृष्ट्या हे खूप आव्हानात्मक असल्याचं ती म्हणाली. पुन्हा एकदा नैराश्याच्या त्याच दिवसांमधून स्वत:ला जाताना पाहणं हे खुद्द दीपिकासाठीही कठीण होतं. 


रणवीरशी लग्न होण्याच्या आधीपासूनच या चित्रपटाच्या तयारीला सुरुवा झाल्याचं दीपिकाने या मुलाखतीत सांगितलं. सुरुवातीच्या काळाता यामध्ये भानवांशी जोडलं जाण्याची कोणती बाब नव्हती. पण, ज्यावेळी प्रोस्थेटीक्सचा चेहरा दीपिकासमोर आला, तेव्हा हे सारंकाही सत्यात उतरत असल्याचं लक्षात येऊ लागलं. प्रोस्थेटीक पाहून हे आपणच असल्याची प्रतिक्रिया दीपिकाने दिली.  


Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच



लग्नाच्या संपूर्ण धामधुमीत, विधींमध्ये चित्रपटाची लूक टेस्ट ती विसरु शकली नव्हती. 'छपाक'साठीची शारीरिक तयारी अगदी सोपी होती असं म्हणत भावनिक तयारीच अधिक महत्त्वाची असण्यावर तिने जोर दिला. अतिशय संवेदनशील मुद्द्यावर कलाकारांची मेहनत पाहता आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.