Disha Patani च्या सौंदर्याचा हा Video पाहाल तर मालदीवही विसरुन जाल
ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याच्या आणि अदांच्या बळावर फॉलोअर्सना घायाळ करत आहे.
मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या अभिनयासोबतच आणखी एका कारणामुळं चर्चेत असते. ते कारण म्हणजे तिचा फिटनेस. कमनीय बांधा आणि मादक अदा अशा रुपात दिशा समोर आली की अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकतो. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याच्या आणि अदांच्या बळावर फॉलोअर्सना घायाळ करत आहे.
बरं तुमच्यापैकी कोणी मालदीव बेटांच्या सौंदर्याबाबत उत्सुक असाल किंवा तिथं जाण्यासाठी बेत आखत असाल तर, तुम्हाला दिशाचा हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी मालदिवच्या सौंदर्याचाही विसर पडेल.
मालदिवला सुट्टीसाठी गेलं असता तिथल्या सौंदर्यामुळं अवाक् झालेल्या दिशानं एक थ्रोबॅक व्हिडीओ म्हणजे तिचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं मिसिंग असं कॅप्शन दिलं आहे. तिचं हे कॅप्शन पाहता, अतिशय व्यग्र वेळापत्रकातून आता तिलाही उसंत हवी आहे हेच स्पष्ट होत आहे.
दिशानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती बिच वेअरमध्ये दिसत असून, ज्या पद्धतीनं ती समुद्राच्या दिशेनं किनाऱ्यावरुन चालत जात आहे ते पाहता समुद्रकिनारी निवांत बसून लाटांचा आवज ऐकण्याचीच अनेकांची इच्छा होत आहे.
हल्लीच दिशा मालदिवला सुट्टीचा आनंद घेऊन मायदेशी परतली आहे. पण, इथं असतानाही तिचं मन मात्र कुठं दूरवर गुंतलं आहे. आता याच मनाची समजुत काढण्यासाठी दिशा सोशल मीडियावर अशा पोस्ट करत आहे.
वर्क फ्रंटच्या बाबतीत सांगावं तर, दिशा 'राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ज्यानंतर आता येत्या काळात ती 'एक विलन 2' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमही झळकणार आहेत.