मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकताचं तिने आपला वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून तूफान कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटानीचा वर्कआऊट व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत दिशा पटानी जड डंबेल उचलताना दिसतेय. तसेच डोले-शोले दाखवतेय.   दिशाचा जिमचा लूक अतिशय साधा ठेवलाय. काळ्या स्पोर्ट्स ब्रासह रंगीबेरंगी लेगिंग्ज परिधान करून दिशा जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.


एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सध्या ती आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी जीममध्ये वर्कआऊट करतेय. बॉलिवूडमधील अनेक सौंदर्यवती फिटनेसकडे लक्ष देत आहेत. मात्र फिटनेसच्या बाबतीत दिशा पटानीला टक्कर देणं सोपं काम नाही. बॉलिवूडच्या फिटनेस क्वीनच्या यादीत दिशा पटानीचे नाव सामील झाले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिशाची फिटनेसची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. ही अभिनेत्री तिच्या वर्कआउट व्हिडिओंद्वारे लाखो तरुणांना फिटनेससाठी प्रेरित करताना दिसते.सध्या तिचा हा व्हिडिओ खूप गाजतोय. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.  


टायगर श्रॉफची कमेंट
दिशा पटानीच्या या व्हिडिओंवर लाखो चाहत्यांचे कमेंट आणि लाईक्स आहेत. या लिस्टमध्ये एका चाहत्यांचे कमेंट भाव खाऊन जाते. तो व्यक्ती आहे, बॉलिवूड अभिनेता, बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफ आपल्या मैत्रिणीला प्रेरित करण्यासाठी या व्हिडिओंवर गोंडस कमेंट करताना दिसतोय.