Pool Bold Video: सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीच्या स्विमिंग पूलमधील व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. चित्रपटांमागोमाग वेब सीरिजच्या विश्वातही दमदार कामगिरी करणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या बदललेल्या रुपानं सर्वांनाच सैराट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं वेब सीरिजच्या निमित्तानं चापूनचोपून साडी नेसत समोर आलेली हीच अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये जाताच बोल्ड झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


कुठे तिनं साकारलेली एका महिलेची भूमिका आणि कुठे ही मादक सौंदर्यवती... अशीच प्रतिक्रिया तिचा व्हिडीओ पाहताना अनेकजण देत आहेत. 


जिच्या चिंब भिजलेल्या कांतीवर सर्वजण भाळले आहेत ती अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. काळ्या रंगाची मोनॉकिनी घातल्यानंतर हुमा स्विमिंग पूलमध्ये आली आणि बस्स, तिच्या एका नजरेनंच सारी जादू केली. 


'जेव्हा तुमच्याकडे बराच वेळ असतो... ' असं कॅप्शन हुमानं या व्हिडीओला लिहिलं. तिच्या या व्हिडीओला 'गहराईयां' या चित्रपटातील गाण्याची जोड असल्यामुळं गाणं आणि तो क्षण एकमेकांशी कमाल मेळ खात असल्याचं स्पष्ट होत आहे. 


हुमानं आजवर बऱ्याच भूमिका साकारल्या. मुळात या भूमिकांमध्ये असणारं वैविध्य प्रेक्षकांना सर्वाधिक भावलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)


अशी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री पत्रलेखा, दिग्दर्शिका फराह खान या तिच्या कलाजगतातील खास मैत्रीणी. हुमाचा हा व्हिडीओ शूच करतवेळीसुद्धा पत्रलेखा किखं असल्याचं स्पष्ट झालं.