मुंबई : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यामध्ये नेमक्या काय घडामोडी सुरु असतात याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कायम मिळत असते. आगामी चित्रपट वगैरे ठीक, पण खासगी आयुष्यातील काही गोष्टी मात्र सेलिब्रिटी गुलदस्त्यातच ठेवतात. अशीच एक गोष्ट, किंबहुना असं एक नातं अभिनेत्री हुमा कुरेशी हिने सर्वांसमोर आणलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन हुमाने एक फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीची सर्वांनाच भेट घडवून आणली. तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक मुदस्सर अजीज. 'पती पत्नी और वो' फेम दिग्दर्शक मुदस्सर आणि हुमा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तिने मुदस्सरसाठी लिहिलेली पोस्ट आणि शेअर केलेले फोटो पाहता याचाच उलगडा होत आहे. 


'आतापर्यंत तू केलेल्या प्रत्येक कामावर मला गर्व आहे...', असं म्हणत त्याला शुभेच्छा देत हुमाने त्याची सर्व स्वप्न पूर्ण होवो, अशा सदिच्छा दिल्या. तिच्या या शुभेच्छांना मुदस्सरने उत्तर देत अतिशय सुरेख शब्दांत तिचे आभार मानले. या दोघांमध्ये झालेला हा संवाद आणि त्यांच्या नात्याचे बंध पाहता, एक प्रकारे त्यांनी या नात्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



हुमा सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. तर, मुदस्सर हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या एका चित्रपटावर काम करण्याला प्राधान्य देत आहे. 'पती पत्नी और वो' असं त्याच्या या चित्रपटाचं नाव आहे, ज्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेत्री अनन्या पांडे झळकणार आहेत.