मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या तिने केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेत आहे. झोपेत चालत असल्याचा खुलासा इलियानाने केलाय. झोपेत चालत असल्यामुळे तिच्या पायाला जखमा होत असल्याचंही तिने म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलियानाने ट्विट करत, 'झोपेत चालत असल्याची गोष्ट मी आता पूर्णपणे मान्य केली आहे...सकाळी उठल्यावर ज्यावेळी माझ्या पायावर सूज, जखमा दिसतात, ते पाहता आणखी काही वेगळं सांगण्याची गरज नाही' असं तिने म्हटलंय. तिच्या या सवयीमुळे ती अतिशय त्रस्त आहे.



इलियानाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही चाहत्यांनी तिला तिच्या रुममध्ये व्हिडिओ कॅमेरा लावण्याचा सल्ला दिलाय. तर काहींनी हा प्रकार हॉन्टेड असल्याचंही म्हटलंय.



सध्या इलियाना आगामी 'पागलपंती' चित्रपटाची तयारी करतेय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. या चित्रपटात इलियानासह जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी आणि पुलकित सम्राट हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत.