मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत करण जोहरने एक मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर करण जोहरने चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरने हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. करणने या घोषणेसह, जान्हवी कपूरच्या आवाजातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.



1999 च्या कारगिल युद्धात चीता हेलिकॉप्टर उडवून युद्ध भागात जाणारी गुंजन सक्सेना पहिलीच एयरफोर्स वुमन ऑफिसर बनली. आज भारतीय हवाई दलात 1600 हून अधिक महिला ऑफिसर असल्याचं सांगत, जान्हवीने या चित्रपटाची हलकीशी झलक दिली आहे. या व्हिडिओसह या चित्रपटाचं एक नवं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. 



अभिनेत्याच्या निधनानं तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर


'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे आता प्रदर्शनानंतर हा चित्रपट काय कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


पाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा