Juhi Chawala Miss Universe 1984: 90 च्या दशकात आपल्या दिलखेचक सौंदर्यानं प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रींची (90's Bollywood Actress) आजही चर्चा होताना दिसते. त्या काळात ग्लॅमर आणि फॅशनची दुनिया मोठी होती. बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींच्या सौंदर्यांची कायमच चर्चा होते, तेव्हाही ती होत होती. आता अशा एका सौंदर्यवती अभिनेत्रीचा एक जूना व्हिडीओ व्हायरल (Juhi Chawla Old Viral Video) होताना दिसतो आहे आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जूही चावला (Juhi Chawala) आहे. नव्वदच्या दशकात जूही चावला ही एक लोकप्रिय अभिनेत्री होती. माधूरी दीक्षित, जूही चावला आणि श्रीदेवी यांच्यात तेव्हा एक वेगळीच स्पर्धा होती. सध्या जूही चावलाचं नावं चर्चेत आलं आहे. तिचा एक 39 वर्षांपुर्वीचा जुना व्हिडीओ (Miss Universe) हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जूही चावलाला ओळखणंही खूप कठीण झालं आहे. (Bollywood actress juhi chawla old miss universe 1984 video goes viral on internet netizens compares her look with kiara advani)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री या कुठल्यातरी माध्यमातून म्हणजेच सौंदर्य स्पर्धेतून विजेत्या होऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या आपण पाहतो. नम्रता शिरोडकर, दीया मिर्झा, प्रियंका चोप्रा, सुष्मिता सेन अशी काही नावं घेता येतील. त्यातील एक नावं म्हणजे जूही चावला. आपल्यापैंकी अनेकांना माहितीही नसेल की अभिनेत्री जूही चावलानंही मिस युनिव्हर्स 1984 (Bollywood Actress In Beauty Pegeant) मधून सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. सध्या तिचा व्हायरल होणारा व्हिडीओ त्याच स्पर्धेतला आहे. या व्हिडीओ जूही चावला ही खूपच तरूण दिसते आहे परंतु तिचा तो लुक पाहून मात्र कोणालाच विश्वास बसत नाहीये की ही जूही चावला आहे. 


सध्या हा व्हिडीओ सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओ खाली जूही चावलाचे चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. त्याखाली कमेंट करणाऱ्यांनी जूही चावलाची तुलना ही अभिनेत्री कियारा अडवाणीशी (Kiara Advani) केली आहे. 1984 मध्ये जूही चावला ही 20 वर्षांचीही नव्हती तर अगदीच सतरा वर्षांची होती. तेव्हाचा तिचा लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धका बसला आहे. यावेळी ती कॉश्चुम राऊंडमध्ये स्वत:ला इट्रोड्यूस करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती पहिल्यांदा एका डार्क ब्लू निळ्या ड्रेसमध्ये दिसते आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर त्यात व्हिडीओच्या दुसऱ्या क्लिपमध्ये ती आपल्याबद्दल उपस्थितांना सांगताना दिसते आहे. या ती (Costume Round) केशरी पारंपरिक कपड्यामध्ये दिसते आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसोबतच तिच्या फॅशनची आणि लुकचीही चर्चा होते. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का?