एका चूक अन् जुही चावलाचा गेला असता जीव, `या` चित्रपटात आहे तो सीन
सनी देओल आणि जुही चावला यांनी या चित्रपटासाठी एक अतिशय कठीण सीन शूट केला होता. त्या सीनमध्ये तिने एक चूक केली असती तर जुही चावलाला तिचा जीव गमवावा लागला असता.
Juhi Chawla : 'अर्जुन पंडित' हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जुही चावला आणि सनी देओल दिसले होते. हा चित्रपट ॲक्शनने भरलेला होता. चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट झाली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये सनी देओल गंभीर जखमी होतो आणि जुही चावला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. या सीनदरम्यान जुही चावलाच्या एका चुकीमुळे तिची मान कापली गेली असती. असा खुलासा अभिनेत्रीनेच एका जुन्या मुलाखतीदरम्यान केला होता. 'अर्जुन पंडित' चित्रपटासाठी जुही चावलाने रेल्वे ट्रॅकखाली तीन फूट खोली हा सीन शूट केला होता.
जुही चावलाने अनेक कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत आणि ते हिट देखील झाले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे 'अर्जुन पंडित'. चित्रपटातील डायलॉग देखील खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अतिशय धोकादायक पद्धतीने शूट करण्यात आला होता.
थोडक्यात वाचला होता जुही चावलाचा जीव
ई-टाइम्सला 2022 मध्ये दिलेल्या मुलाखतीत जुही चावला म्हणाली होती की,'अर्जुन पंडित' या चित्रपटातील एक सीन रेल्वे यार्डमध्ये शूट करण्यात आला होता. ज्यामध्ये सनी देओल आणि जुही चावलाला गुंडांपासून वाचण्यासाठी लपावे लागते. सनी देओल आणि जुही चावला महालक्ष्मी यार्डमधील रेल्वे ट्रॅकखाली तीन फूट खोल खंदकात लपले होते. या सीनमध्ये ट्रेन त्यांच्यावरती असणाऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगाने जाते. त्यावेळी आम्हा दोघांना कोणत्याही परिस्थितीत त्या खंदकापासून एक इंचही पुढे जाता येत नव्हते. कारण त्यावेळी थोडीशी चूक झाली असती तर माझी मान कापली गेली असती.
जुही चावला पुढे म्हणाली की, 'त्यावेळी मी सनी देओलला घट्ट पकडून ठेवले आणि सर्व काही देवावर सोडले. मला तो सीन पुन्हा करायला सांगितला असता, तर कदाचित मी ते पुन्हा कधीच केला नसता. या चित्रपटात सनी देओल आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघांनी 'डर' या चित्रपटात देखील एकत्र काम केले आहे.