मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांनी कलाविश्वात कायमच त्यांच्या वक्तचव्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य म्हणजे कंगनाच्या प्रत्येक भूमिकेविषयी रंगोलीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत आपल्या बहिणीची पावलोपावली पाठराखण करताना पाहायला मिळाली. असं असलं तरीही आता या बहिणींमध्ये कोणा एका विषयावरुन खटका उडाल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगोली आणि कंगनामध्ये खटका उडाला आहे तो म्हणजे एका ट्विटमुळे. ज्यामध्ये कंगनासोबतच्या काही खासगी गोष्टींचा उल्लेखही रंगोलीने ट्विटमध्ये लिहिला आहे. याची सुरुवात झाली तापसी पन्नू हिच्या 'थप्पड' या चित्रटाविषयी दिग्दर्शक अहमद खान याने दिलेल्या प्रतिक्रियेपासून. ज्यावर आपलं मत मांडत पतीने जर मला कानशिलाक लगावली तर मी त्याला चांगलाच धडा शिकवेन, त्याला एकटं सोडेन असं म्हटलं. 




रंगोलीने इतक्यावरच न थांबता कंगनाची या मुद्द्यावरील प्रतिक्रियाही सर्वांपुढे मांडली. ज्यामध्ये त्यांच्यात झालेल्या खासगी गप्पाही सर्वांपुढे मांडल्या. तिची ही कृती पाहता कंगनाने रंगोलीवर नाराजी व्यक्त केली. याचा खुलासा एका ट्विटमध्ये केला. इतक्यावरच न थांबता आपल्याला कंगनाने ताकिद दिल्याचंही सांगितलं. 




पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


आपल्या पहिणीकडून मिळलेली ही ताकिद पाहता रंगोलीच्या ट्विट्सची नेटकऱ्यांमध्येही बरीच चर्चा झाली. कंगना स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट चाहत्यांच्या संपर्कात येत नसली तरीही तिच्या वतीने बहिण रंगोलीच अनेकदा तिच्या भूमिका सर्वांपुढे आणते. किंबहुना सेलिब्रिटी वर्तुळात कंगनाविरोधात असणाऱ्यांनाही ती सडेतोड उत्तर देते. पण, उत्साहाच्या भरात अतिशय खासगीतील गप्पा अशा सर्वांपुढे आणण्याची तिची कृती काही कंगनाला रुचलेली नाही हे खरं.