मुंबई : शाहिद कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाच्या कमाई दिवसागणिक भर पडत आहे. किआरा अडवाणीसोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या चित्रपटाच्या लोकप्रियतेसाठी आकर्षणाचा आणखी एक मुद्दा ठरत आहे. पण, तरीही कबीर सिंगला अनेकांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप वंगा दिग्दर्शित याच चित्रपटाची पाठराखण करण्यासाठी आता खुद्द दिग्दर्शकांमागोमाग अभिनेत्री कंगना रानौत हिची बहिण रंगोली चंदेलचाही समावेश झाला आहे. 


रंगोलीने एकामागोमाग एक असे काही ट्वीट करत शाहिदने साकारलेल्या 'कबीर सिंग'ची तुलना झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाशी केली आहे. आलियाने या चित्रपटात साकारलेली सफीनाची भूमिका ही शाहिदने 'कबीर सिंग'पेक्षा जास्त हिंसक होती यामागची कारणंही तिने स्पष्ट केली. 


'ही जी काही काम नसणारी मंडळी आहेत ज्यांनी कबीर सिंगला निशाणा केलं आहे त्यांना गली बॉयमधील सफीनामध्ये काहीच खटकलं नाही का? ती तर कबीर सिंगपेक्षा कैक पटींनी हिंसक होती', असं रंगोलीने ट्विटमध्ये लिहिलं.





'गली बॉय' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि कल्की कोचलीन यांच्यमध्ये मारामारी आणि मतभेदही झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यावरच निशाणा साधत स्त्रीवादाचे पुरस्कर्ते या अशा दृश्यांवर टाळ्या वाजवतात असा टोला तिने लगावला. 




गेल्या काही दिवसांपासून कंगनाच्या बहिणीच्या म्हणजेच रंगोली चंदेलची बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तापसी पन्नुवरही रंगोलीने काही दिवसांपूर्वी निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिने आलियाने साकारलेल्या एका भूमिकेवर टीका केली होती.