मुंबई : हिंदी कलाविश्वात अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली या बहुविध कारणांसाठी चर्चेत असतात. परखडपणे कंगनाच्या वतीने आणि स्वत:चीसुद्धा मतं मांडणाऱ्या कंगनाच्या बहिणीची म्हणजेच रंगोली चंदेल हिची सोशल मीडियावर बरीच चर्चाही असते. पण, याच रंगोलीचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वादग्रस्त ट्विटमुळे तिचं ट्विटर अकाऊंट सप्सेंड करण्यात आलं. पण, तिच्या मुळ ट्विटचा स्क्रीनशॉट मात्र त्यापूर्वीत व्हायरल झाला होता. अमुक एका समुदायाविषयी रोषाच्या भावनेने करण्यात आलेल्या ट्विटमुळे ही कारवाई केली गेल्याचं कळत आहे. आपल्यावर झालेल्या या कारवाईवर व्यक्त होत आता तिन थेट ट्विटरवरच निशाणा साधला आहे. ज्यामध्ये भारत विरोधी असल्याचा आरोप तिने ट्विटरवर केल्याचं म्हटलं जात आहे. 


'ट्विटर हे एक अमेरिकन व्यासपीठ आहे. अर्थातच ते पक्षपाती आणि भारत विरोधी आहे. तुम्ही हिंदू देवदेवतांची थट्टा करता, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून उल्लेख करतात, पण तुम्ही जेव्हा आरोग्य अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्यांवर काही लिहिता तेव्हा मात्र तुमचं अकाउँट सप्सेंड करण्यात येतं. मला अशा कोणत्याही व्यासपीठावर माझी प्रामाणिक मतं मांडायची नाहीत', असं रंगोली म्हणाली.


 


मतं मांडण्यासाठी आणि इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटव्यतिरिक्त इतरही माध्यमं असल्याचं म्हणत तिने झाल्या प्रकरणावर कठोर वक्तव्य केलं. तेव्हा आता तिचं हे वक्तव्य आणि या सर्व भूमिका पाहता कलाविश्वात याविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.