डाएटला मारा गोळी; इथे करिना बिर्याणी हाणताना पाहून सगळे म्हणतात...
बेगम... हे काय चाललंय तुझं?
मुंबई : दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री करिना कपूर खान हिनं तिचा फिटनेस प्राधान्यानं जपला आहे. सूर्यनमस्कार, योगसाधना आणि संतुलित आहाराच्या सवयींमुळे करिना कायमच इतक्या सुंदर रुपात आपल्या समोर येते. (Kareena Kapoor)
अनेकजणींनी तर तिच्याप्रमाणं शरीरयष्टी आणि फिटनेस मिळवण्यासाठी तिचा डाएट प्लान वगैरे जाणून घेण्यासाठीही प्रयत्न केले. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून आता ती खरंच डाएट वगैरे करते का यावरून पडदा उठला आहे.
इन्स्टाग्रामवर स्वत: करिनानंच एक व्हिडीओ पोस्ट करत आपण बिर्याणीवर कसा ताव मारत आहोत, हे सर्वांसमोर आणलं. इथं एका मोठ्या डब्यातून करिना आणि तिच्या टीममधील सदस्य बिर्याणीचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसत आहे.
आपल्या आवडीचा पदार्थ जीभेवर तरळल्यानंतरचे भाव नेमके कसे असतात हे करिनाचा हा व्हिडीओ पाहून लगेचच लक्षात येत आहे.
करिना आणि तिच्या टीम मेंबर्सना बिर्याणी इतकी आवडलीये, की हा डब्बा रिकामाच परत जाईल, असंही ती म्हणताना दिसत आहे. बरं समोर बिर्याणी असतानाच करिना चक्क मूगडाळीच्या हलव्याचाही उल्लेख करताना दिसत आहे.
खाण्यावर तिचं असणारं प्रेम आणि त्याप्रती व्यक्त होणाऱ्या करिनाला पाहून अनेकजण थक्क होत आहेत.
कारण, वजन वाढतं म्हणून भात नको, मसालेदार, तेलकट- तुपकट पदार्थ नको हे नको आणि ते नको म्हणणाऱ्यांना करिनाकडे पाहून हेवाच वाटत आहे.
मुळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी मन प्रसन्न आणि निरोगी ठेवणंही किती महत्त्वाचं असतं हेच नकळत करिना या व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहे.
तिच्या आठवड्याची सुरुवात तर दणक्यात झाली. तुमचं काय?