सासूबाईंसमोरच करिनाची नामुश्की; ड्रेसचा कट रुंद झाला आणि...
काय करु आणि काय नको, अशीच करिनाची त्यावेळी अवस्था झाली होती.
मुंबई : सडेतोड उत्तरं आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी अभिनेत्री करिना कपूर ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्या क्षणापासून तिनं विविध भूमिका साकारल्या. करिनाच्या व्यक्तीमत्त्वानं आणि तिनं साकारलेल्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांवर जादू केली. (Kareena Kapoor Khan)
फॅशन सेन्सच्या बाबतीत सांगावं तर, ही अभिनेत्री कधीच चुकलेली नाही. पण, एका प्रसंगानं मात्र तिच्यावर नामुश्की ओढावली होती.
काय करु आणि काय नको, अशीच करिनाची त्यावेळी अवस्था झाली होती. कारण, त्यावेळी जर काही चुकीचं घडलं असतं तर तिच्या सासुबाईंनाही टीकेला सामोरं जावं लागलं असतं.
सैफच्या बहिणीच्या बुक लाँचसाठी करिना आणि सैफचं कुटुंब पोहोचलं होतं. त्यावेळी 'बेबो'नं डीप नेकलाईन, चोकर नेक असणारा लाल रंगाचा एक ड्रेल घातला होता. या लूकमध्ये करिनाचं सौंदर्य खुलून आलं होतं, यात वाद नाही. (Saif Ali khan)
तिच्या या लूकमध्ये फक्त एकच उणील होती, ती म्हणजे ड्रेसची नेकलाईन अतिशय डीप असल्यामुळं कट रुंद होताच करिना थोडी Uncomfetable होताना दिसली. सासूबाई समोर असतानाच करिना तिच्या केसांच्या मदतीनं समोरील भाग झाकताना दिसली.
एकदोनदा नव्हे, तर वारंवार ती केस पुढे घेताना दिसली आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हेसुद्धा टीपलं. बस्स... मग काय, पुढे हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि करिनाच्या Oops Moment चीच तुफान चर्चा झाली.