Big News : Katrina kaif, Vicky kaushal ला जीवे मारण्याची धमकी, भीतीपोटी उचललं मोठं पाऊल
कोणाच्या मनात या जोडीविषयी राग?
Katrine Kaif Vicky Kaushal : बॉलिवूडचं स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती, अभिनेता विकी कौशलच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या लोकप्रिय जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं सावधगिरी बाळगत या जोडीनं सांताक्रुझ पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.
प्राथमिक माहितीच्या बळावर सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून, पोलीस धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेत असल्याचं कळत आहे.
कतरिना कैफ आणि विकी काही दिवसांपूर्वीच मालदीवहून परतले. अभिनेत्रीच्या वाढदिवसासाठी ती दोघं आणि काही मित्रमंडळींसह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रवाना झाली होती. एकिकडे त्यांच्या या सुट्ट्यांची चर्चा असतानाच दुसरीकडे एकाएकी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळं कलाजगतातही भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सलमान आणि त्याच्या वडिलांनाही मिळालेली धमकी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ज्यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.