मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ अणि आलिया भट्ट या एकेकाळी बी- टाऊनच्या बीएफएफ म्हणून ओळखल्या जायच्या. इथे त्यांच्या  नात्याचा उल्लेख भूतकाळात करण्याचं कारण म्हणजे आलिया आणि कतरिनाच्या नात्यांध्ये काही प्रमाणात बदल झाल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं. पण, सुदैवाने या साऱ्या अफवा ठरल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाने आणि आलियाने त्यांच्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचंच सांगितलं. किंबहुना ज्यावेळी कतरिनाला आलियाविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिने या नात्याची सुरेख बाजूच सर्वांसमोर मांडली. 


'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये तिने याविषयी आपली प्रतिक्रिय़ा दिली. 


'जेव्हा आलिया आणि मी एकत्र असतो तेव्हा आम्ही खूप धम्माल करतो', असं कतरिनाने स्पष्ट केलं. दीपिकासोबतच्या नात्याविषयीही तिने अशीच प्रतिक्रिया दिली. जीममध्ये या तिघीही अनेकदा एकत्र असल्यामुळे नात्यात तितकी सहजता असल्याचं तिने सांगितलं. 


आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या तिघींमधील एक समान दुवा म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. 


चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर रणबीरने दीपिका पदुकोणला डेट करण्यास सुरुवात केली होती. ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. 


दीपिकानंतर रणबीरचं नात कतरिनाशीही जोडलं गेलं. किंबहुना काही दिवस ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. पण, हे नातंही फार काळ टीकू शकलं नाही. 


 


सध्याच्या घडीला रणबीर आलिया भट्ट हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून, ते पुढच्या वर्षी लग्नाच्या बेडीतही अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे एका अर्थी नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटवत ही कलाकार मंडळी आता त्यांच्या आयुष्यात बरीच पुढे गेली आहेत, असं म्हणायला हरकत नाही.