मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याप्रमाणेच हुबेहूब चेहरा असणाऱ्या अलीना राय हिला पाहून नेटकरी सध्या अवाक् झाले आहेत. तिच्या आणि कतरिनाच्या चेहऱ्यामध्ये असणारं साम्य नेमकं इतकं कसं असा प्रश्नही काहींना हैराण करत आहे. इन्स्टाग्रामवर 209000 फॉलोअर्स असणारी अलीना एकाएकी प्रकाशझोतात आली आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे अर्थातच तिच्या आणि कतरिनाच्या चेहऱ्यात असणारं साधर्म्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच तिनं 'फेमस हूँ' या कॅप्शननं एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्याला आतापर्यंत 2785 लाईक्स मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 'लखनऊ जंक्शन' नावाच्या एका चित्रपटामध्येती तिला संधी मिळाली आहे. तिनंच काही दिवसांपूर्वी याची क्लिपही शेअर केल्याचं म्हटलं गेलं होतं. 


कतरिनाप्रमाणंच दिसणाऱ्या या तरुणीला पाहून चाहते अवाक् झाले आहेत. त्यामुळं खऱ्याखुऱ्या कतरिनाशी नाव जोडलं जाणारा विकी कौशल आणि तिचा खास मित्र सलमान खानही या तरुणीला पाहून काहीसे गोंधळतील अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. 



मागील काही काळापासून कतरिनाचं नाव अभिनेता विकी कौशल याच्याशी जोडलं जात आहे. किंबहुना काही दिवसांपूर्वी तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला होता. त्यामुळं आता येत्या काळात या जोडीचं भविष्य नेमकं काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.