मुंबई : काही वर्षांपूर्वी श्रीदेवी यांच्या धाकट्या लेकिचा फोटो तुम्ही पाहिला असेल, तर तुम्हाला तिचा चेहरा लक्षातच असेल. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या मोठ्या मुलीनं म्हणजेच जान्हवीनं (Janhavi Kapoor) काही वर्षांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामागोमाग आता त्यांची धाकची लेक म्हणजेच खुशी कपूर हीसुद्धा बॉलिवूडमध्ये Grand Entry मारण्यासाठी सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दोन ते तीन वर्षांमध्ये खुशी प्रचंड बदलली आहे. रंग- रुपापासून ते अगदी अंगकाठीपर्यंत तिनं स्वत:वर बरीच मेहनत घेतली आहे. कलाजगतात आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी म्हणून खुशीनं आपलंसं केलेलं हे Body Transformation अनेकांच्याच नजरा खिळवून ठेवत आहे. 


सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या खुशीनं नुकतेच काही फोटो शेअर केले. यामध्ये तिचा एक मिरर सेल्फीसुद्धा पाहायला मिळत आहे. या सेल्फीमध्ये क्रॉप टॉप मध्ये दिसत आहे. (Khushi kapoor)


खुशीनं घातलेला जॉगर्स ड्रेस तिच्या कमनीय बांध्यावर सर्वांच्या नजरा खिळवत आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वास पाहता हा बाथरुम सेल्फीही कमाल चर्चा रंगवताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी तर, खुशीचा हा फोटो पाहिल्यानंतर तिची तुलना kim kardashian शी केली आहे. 



ही तर भारताची kim kardashian, असं म्हणत तिच्या फोटोंवर काहींनी कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, खुशी लवकरच Archies या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2023 मध्ये ही सीरिज Netflix च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.