मुंबई : कलाकारांचं जगणं, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी कायमच सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण करतात. मला अनुक अभिनेत्रीचे कपडे आवडतात, तर तमुक अभिनेत्रीचं घर आवडतं असं सांगणारे कित्येत चाहते आपल्याला भेटले असतील. किंबहुना आता हे वाचतानासुद्धा आपणही मनात या कुतुहलाच्या विचारात असू, जिथं एखाद्या कलाकाराचं नाव समोर येतच असेल. (Madhuri Dixit )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच कलाकारांमध्ये एक नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचं. 


'धकधक गर्ल' म्हणून लोकप्रिय असणारी ही अभिनेत्री मागच्या कैक दशकांपासून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. 


पण, तुम्हाला माहितीये का ती आता जिथं पोहोचली, ज्या यशामुळं ती इतकी लोकप्रिय झाली इथवर येण्याचा तिचा मार्ग दिसत असला तरीही तितका सोपा नव्हता. 


1993 मध्ये 'खलनायक' हा माधुरीचा सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट 
ठरला. तर 90 च्या दशकात सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा चित्रपट ठरला होता. 


वाचून हैराण व्हाल, पण या चित्रपटासाठी दिग्दर्शक सुभाष घई यांनी माधुरीकडून एक क्लॉज अर्थात एक करार स्वीकारून (साईन करुन )घेतला होता. 


चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांनी एक अट माधुरीसमोर ठेवली होती. ज्याअंतर्गत ती गरोदर राहणार नाही अशी अट तिला स्वीकारावी लागली होती.


भारतीय चित्रपटांमध्ये असं पहिल्यांदाच झालं होतं, जेव्हा एखाद्या निर्मात्यानं अभिनेत्रीकडून असा क्लॉज साईन करुन घेतला होता. 


पण असं नेमकं का करावं लागलं? 
असं म्हटलं जातं की, त्यावेळी माधुरी आणि संजय दत्त यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्रा होती. ज्यामुळं सुभाष घई यांना चिंता होती की चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच हे दोघं लग्न तर करणार नाहीत. 


ज्यामुळं या चित्रपटाच्या वेळी माधुरीकडन नो प्रेगनेन्सी क्लॉज अर्थात गरोदर राहता येणार नाही अशी अटच स्वीकारून घेतल्याचं म्हटलं जातं.


मुख्य म्हणजे घई यांच्या चित्रपटासाठी माधुरीनं ही अट स्वीकारली पण, आजपर्यंत याचा अधिकृत खुलासा मात्र कधीच झाला नाही किंवा करण्यात आला नाही.