माधुरीचं घरभाडं ऐकून वाढेल तुमची `धकधक`
अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत
मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान राहणीमानाचा कायमच चाहत्यांना हेवा वाटत असतो. यामागची कारणं अनेक असतात. कोणा सेलिब्रिटीचं घर, त्यांच्याकडे असणाऱ्या कार आणि इतरही अनके गोष्टी. सेलिब्रिटी म्हटलं की ओघाओघाने त्यांच्या राहत्या घराबाबतही प्रकर्षाने कुतूहल व्यक्त करण्यात येतं. सध्या अशाच एका कुतूहलपूर्ण प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. ज्या उत्तरामुळं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.
हा कुतूहलपूर्ण प्रश्न आहे, माधुरी दीक्षितच्या घराबाबतचा. सूत्रांच्या माहितीनुसार माधुरी मुंबईत एका अतिशय आलिशान घरात राहते. ज्या घराचं भाडं म्हणून तिला तब्बल 12.5 लाख रुपये इतकी रक्कम दर महिन्याला भरावी लागते.
29 व्या मजल्यावर आहे घर....
माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार माधुरी तिच्या मुंबईतील या घरात तीन वर्षांसाठी राहण्याचा करार करुन झाली आहे. वरळीतील इंडियाबुल्स ब्लूमध्ये तिचं हे घर आहे. तिचं हे घर जवळपास 5500 चौरस फुटांचं आहे.
वरळीतील घरासाठी माधुरीनं 3 कोटी रुपयांचं डिपॉझिट जमा केलं आहे. ब्रोकर्सच्या माहितीनुसार या Glass Facade बिल्डिंगमध्ये जवळपास 300 अपार्टमेंट्स आहेत. ज्यामध्ये 2, 3 आणि 4 बीएचके घरं आहेत. 4.5 पासून 15 कोटींपर्यंत या घराच्या किंमती आहेत.