I said yes! अर्जुनसोबत लग्नासाठी मलायकाचा होकार
अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship).
Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship). अनेक वर्षांचं वैवाहिक नातं आणि सर्वच गोष्टी मागे सोडल्यानंतर तिनं पुन्हा एकदा स्वत:लाच एक नवी संधी दिली. पाहता पाहता मलायका आणि अर्जुनचं नातं आणखी दृढ झालं (Malaika Arjun). सर्वांसमोर त्या दोघांनीही या नात्याचा तितक्यात आत्मविश्वासानं आणि आपुलकिनं स्वीकारही केला. (Bollywood Actress Malaika Arora and arjun kapoor are getting married rumors are in full swing)
कायम एकमेकांची साथ
एकामेकांचे वाढदिवस असो, मित्रपरिवारासोबत एखादं सेलिब्रेशन असो किंवा मग आणखी काही. प्रत्येक ठिकाणी मलायकाला (Malaika arora wedding) अर्जुनची साथ मिळताना दिसते. अशी ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार, हाच प्रश्न चाहते गेल्या काही दिवसांपासून विचारत आहेत.
वाचा : 'फक्त एक दिवस बाकी...', समंथा रुथ प्रभूची 'ती' पोस्ट चर्चेत
आता मात्र फार काळ हा प्रश्न विचारावा लागणार नाही. कारण? अहो कारण काय विचारताय. मलायकाची इन्स्टाग्राम (Malaika Arora instagram) पोस्टच तुम्हाला यासंदर्भातली उत्तरं देत आहे. तुम्ही पाहिली का तिची पोस्ट?
पाहा ती काय म्हणतेय....
Malaika च्या ज्या इन्स्टाग्राम पोस्टची इतकी चर्चा सुरु आहे, त्यामध्ये तिनं स्वत:चाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती लाजताना दिसत आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव घेऊन कोणीतरी खोड काढतं तेव्हा जे भाव असतात, अगदी तसेच भाव मलायकाच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. बरं, तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, I Said YES.
आता हे कॅप्शन आणि फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल? अर्जुनचं लग्नाचं प्रपोजल मलायकानं स्वीकारलंय असंच आता सर्वांना वाटू लागलं आहे. चाहत्यांनी तर या जोडीला शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली आहे. काहीनी त्याहीपुढे जात त्यांच्या लग्नाची स्वप्नही रंगवली आहेत. आता ही जोडी नेमकी लग्नाची अधिकृत माहिती केव्हा देते याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.