ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका- अर्जुनचा `असा` फोटो समोर; चाहते संभ्रमात
त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला.
मुंबई : मागच्या तीन वर्षांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांचं नातं सर्वज्ञात आहे. एकिकडे ही जोडी विवाहबंधनात केव्हा अडकते, याबाबतची उत्सुकता असतानाच दुसरीकडे मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला.
मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप झाल्याचं चाहत्यांच्या कानावर पोहोचलं आणि पाहता पाहता चाहच्यांमध्ये या विषयानं अनेक मुद्द्यांना वाव दिला.
आपल्या नात्याविषयी होणाऱ्या याच सर्व चर्चांमध्ये आता मलायका आणि अर्जुनचा एक फोटो समोर आला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला हा फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहे.
अर्जुन आणि मलायका या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही स्टोरीज शेअर केल्या. सुट्टीचा आनंद घेतानाचे क्षण त्यांनी या फोटोंच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणले.
अर्जुननं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तो त्याचं पिळदार शरीर फ्लाँट करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये तो पाठमोरा बसलेला दिसत आहे.
मोबाईल स्क्रोल करताना जेव्हा ती आपल्याला पाहते... असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं आहे. आता त्याच्या फोटोमध्ये नमूद केलेली 'ती' म्हणजे नेमकी कोण हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
मलायकानंही अर्जुनप्रमाणेच इन्स्टा स्टोरीमधून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती समुद्रकिनारी अतिशय शांतपणे या क्षणांचा आनंद घेताना दिसली.
आधी मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याबाबत खुलेपणाने बोलत नव्हते. पण, आता मात्र ही जोडी विविध कार्यक्रमांनाही एकत्रच हजेरी लावू लागली आहे.
एकंदरच मलायका आणि अर्जुनचा हा अंदाज पाहता, त्यांची ही जोडी सध्या मोस्ट हॅपनिंग आणि मोस्ट सिझलिंग जोड्यांपैकी एक आहे, असं म्हणायला हरकत नाही.