मुंबई  : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्यानं आता सर्वांनाच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम करता येऊ शकतं, हेच पटवून दिलं आहे. वयांमध्ये असणारं अंतर कधीही प्रेमाच्या आड या दोघांनीही येऊन दिलं नाही. (Malaika Arora Arjun Kapoor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवश्यक तिथे त्यांनी हे नातं गुलदस्त्यात ठेवलं आणि जिथे गरज वाटली, तिथे ते दोघंही व्यक्त झाले. 


नुकत्याच झालेल्या व्हॅलंटाईन्स डेच्या दिवशीसुद्धा मलायका आणि अर्जुननं चाहत्यांच्या नजरा वळवल्या. 


पण, आता म्हणे आपल्याच एका कृतीमुळं मलायकाला पश्चाताप होत आहे. 


आता हे प्रेमाचं नातं, पश्चातापाच्या वळणावर का आलं हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. 


तर, मलायकानं Valentines day ला जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तो फोटो आधी अर्जुन शेअर करणार होता. पण, झालं उलटंच. 


Mine, असं लिहित मलायकानं जो फोटो शेअर केला, तिथे अर्जुन तिच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. एकमेकांच्या मिठीत आणि प्रेमात जणू ही जोडी आकंठ बुडाली आहे. 


व्हॅलंटाईन्स डे च्या नंतर या फोटोमागचं गुपित समोर आलं. कारण, अर्जुननं इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, कसं मी तुला एक फोटो पाठवला आणि तू मलाच मागे टाकलंस आणि हा फोटो आधीच शेअर केलास. 



अर्जुनची ही स्टोरी मलायकानं तिच्या प्रोफाईलवर शेअर करत गिल्टी, असं लिहित शेअर केली. 


मलायका आणि अर्जुन यांची ही प्रेमळ वादावादी सोशल मीडियावर प्रचंड गाजली.