Malika Arora Arjun kapoor : मलायका अरोरा ही अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जिनं जाहीरपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत फारसं वक्तव्य केलं नसलं तरीही तिच्या कृतींतून मात्र अनेकदा या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आता मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. कारण, मलायका तिच्या खासगी आयुष्यावरही बोलण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. (Bollywood Actress Malaika Arora ex husband Arbaaz Khan boyfriend Arjun Kapoor to attend the show)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार मलायका, तिची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora) हिच्यासोबत एका शोमध्ये दिसणार आहे. Arora Sisters असं या शोचं नाव. Disney Plus Hotstar वर या शोचं स्ट्रीमिंग होणार आहे. बरं, त्याहीपलीकडली मोठी बातमी म्हणजे या कार्यक्रमात पाहुणे म्हणून अर्जुन कपूर आणि अरबाज खान ही सेलिब्रिटी मंडळी झळकणार आहेत. 


अर्जुन आणि अरबाज बॉलिवूड सेलिब्रिटी असण्याव्यतिरिक्तही त्यांचं मलायकाच्या आयुष्यात असणारं स्थान महत्त्वाचं आहे. कारण, अरबाज हा तिचा Ex Husband आहे, तर अर्जुनसोबत मलायका सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. 


अधिक वाचा : Samantha Ruth Prabhu अध्यात्माच्या मार्गावर? म्हणते, 'आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींचा संबंध...?'


 


अर्जुन आणि अरबाजला (Arbaaz khan) या कार्यक्रमात एकत्र बोलवून मलायका यामध्ये त्यांच्यासोबतच्या नात्यावर वक्तव्य करु शकते.  मुख्य मुद्दा असा, की हे दोघंही तिच्या कार्यक्रमात एकत्र येणार नाहीत त्यामुळं नात्याबाबतचे नवे पैलू चाहत्यांसमोर येणार हे मात्र नक्की. 


1998 मध्ये मलायकानं सलमान खानचा (Salman Khan) भाऊ, अरबाज खान याच्याशी लग्न केलं होतं. 2017 मध्ये या जोडीच्या नात्यात दुरावा आला. ज्यानंतर अर्जुन कपूरसोबत मलायका रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली. अर्जुनसोबतचं तिचं नातं आता सर्वज्ञात झालं आहे. किंबहुना ही जोडी विवाहबंधनात अडकून नात्याला नवं नाव केव्हा देणाच याबाबतचीच उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे.