मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिनं अनेक दशकं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मलायका प्रत्येक वेळी चाहत्यांसमोर आली ती त्यांना थक्क करण्यासाठीच. मग ते चित्रपटांमधील भूमिकांच्या माध्यमातून असो किंवा आणखी कोणत्या वेगळ्या कारणानं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्यामुळंही प्रकाशझोतात आहे. चाहत्यांना सतत कपल गोल्स देणारी ही जोडी आता इतरांनाही हेवा वाटेल अशाच अंदाजात दिसत आहे. तुम्हाला माहितीये का, हीच मलायका एक राजकुमारी आहे.


सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. जिथं मलायकाचं राजकुमारीचं रुप चाहत्यांना घायाळ करत आहे. डीप नेक चोळी आणि इंटेन्स लूकमध्ये ही अभिनेत्री पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवत आहे.


आता तुम्ही म्हणाल, मलायका आणि राजकुमारी? ही काय नेमकी भानगड? तर, विरल भयानीनं सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इथं ती ब्रायडल लूकमध्ये एका राजकुमारीप्रमाणंच शोभून दिसत आहे.



मलायकाच्या या लूकला निमित्त ठरत आहे ते म्हणजे लॅक्मे फॅशन वीक 2021.. पाच दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी मॉडेल्सनीही हजेरी लावली. जिथं बी- टाऊन सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. फॅशन डिझायनर अन्नूसाठी मलायका शो स्टॉपर झाली होती, ज्यासाठीच तिनं हा लूक केला होता.


मलायकाच्या या लूकनं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला खरा, आता त्यावर अर्जुननं नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे जाणू घेणंही रंजकच असेल. नाही का....